Wednesday, March 24, 2010
ऊन जरा जास्त आहे....दरवर्षी वाटतंभर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं...तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही,घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही...तितक्यात कुठुन एक ढग सूर्यासमोर येतो...तितक्यात कुठुन एक ढग सूर्यासमोर येतो,उन्हामधला कांही भाग, पंखां खाली घेतो...वारा उनाड मुलासारखा सैरा-वैरा पळत राहतो..,पाना-फुला झाडावरती छपरावरती चढुन पाहतो...दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ,उन्हामागुन चालत येते गार-गार कातर वेळ....चक्क डोळ्यांसमोर ऋतु कूस बदलून घेतो...पावसा आधी ढगां मध्ये कुठुन हा गारवा येतो....?
Subscribe to:
Comments (Atom)